Monday, May 21, 2018

लॉस्ट इन मी...फाऊन्ड इन यु...

     
      सर्वप्रथम आजवर मी करीत आलेल्या लिखाणाला तुम्ही साऱ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिलात तसेच 'अंतरंगातील इंद्रधनुष्य’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला स्विकारलत यासाठी मनापासून आभार मानते. कलाकार मग तो कोणत्याही कलेचा धनी का असेना दर्दी रसिकांची दाद मिळते तेव्हाच कलेचं इतिकर्तव्य पुरं होतं. ब्लॉगसंस्कृतीचा फारसा अनुभव नसल्यामुळे जे काही उणे अधिक राहील त्याबाबत सुरूवातीलाच क्षमाप्रार्थी आहे.
      मथळा 'लॉस्ट इन मी…फाऊन्ड इन यु’ काय सुचवू पाहतोय हे आता ओघाने समजत जाणारच आहे. स्वत:च्याच एकाकीपणामध्ये हरवलेले आपण म्हणजे येन केन प्रकारेण बहुतांशी आपण सारेच. असंख्य रूपे असलेलं हे एकाकीपण जरी व्यक्तीपरत्वे भिन्न असलं तरी त्याचा उपचार घ्यायला दुर्दैवाने तो काही विकार नाही आणि ज्याला त्याला आलेलं एकाकीपण हर तऱ्हेने वेगळं असतं. कुणी जोडीदाराच्या विरहाने एकटं पडलेलं असतं तर कुणी एकाच छताखाली एकमेकांना पारखे होऊन आपापल्या जगात वावरत असतात. कुठे आजी-आजोबांच्या गोष्टींशिवायच लहानग्यांचं बालपण अपूर्ण राहतं तर कुठे थरथरत्या हातांनी पोटची खळगी भरताना विचित्र नैराश्य बोचत असतं. बोहल्यावर चढताना आजुबाजुला अख्खा कुटुंबकबिला का असेना पण आपल्या जन्मदात्या मातापित्यापैकी कुणी अस्तित्वात नसेल तर त्या वेळचं एकटेपण कमालीचं दयनीय असतं. सणाचं औचित्य साजरं करायला आपली व्यक्तिच जवळ नसेल तर तो सण तोच आनंद घेऊन येतो का? सत्यवान जवळ नसला तर सावित्रीच्या व्रताची पूर्ती होईल का? भावाविना राखी पौर्णिमा पुरी होऊ शकेल का? दिवसभरच्या कामांमधून दुपारचं कोणीच सोबत नसल्याने आलेलं अटळ  एकटेपण ही देखील घरच्या गृहिणीची फारशी लक्षातही न येणारी भ्रांतच होय.कधी असंही होतं की आपल्यापाशी सारंकाही आहे, आपल्या एका हाकेसरशी धावून येणारेही अमाप आहेत पण नेमकी ती व्यक्ति नाही जी अगदी त्या क्षणाला सोबत हवी असते आणि तिच्या नसण्याने सगळं असूनही काहीच नसतं. मन धुमसत राहतं, चिडचिड करत, चरफडत राहतं पण या साऱ्याने निष्पन्न काहीच होत नाही.
        सुख आणि प्रेम या दोनच अगम्य आणि तितक्याच साध्या सरळ गोष्टी दिल्याने वाढतात. अन्यथा वाटल्याने कमीच होणाऱ्या गोष्टींना एकटेपणाही अपवाद नाही. आपलं मन मुळातच भौतिक असो वा भावनिक, परंतु आपल्यापाशी नसणाऱ्या गोष्टींचाच धावा करत राहतं. मग आपलच दु:ख आभाळाएवढं अन इतरांचं कस्पटासमान ही परिस्थिती होते. स्वत:ला कशात ना कशात रमवलं की मनालाही कळत नाही आपण एकटे वगैरे आहोत.  We find ourselves in someone’s lonely space… म्हणूनच…for every 'lost in me…' there’s a ‘found in you’option…दुसऱ्याचं एकटेपण वाटून घ्यायचा प्रयत्न केला तर स्वत:चा स्वत:ला नव्याने शोध लागतो. आपणच आपल्याला नव्याने गवसतो. करूया का मग प्रयत्न?


----नमस्कार----
अनघा

35 comments:

  1. खूप सुंदर लिहिलंय....
    पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. Khup sundar.. ani arthapurna👌👌

    ReplyDelete
  3. hi Ana , लिखाण खूपच अप्रतिम , सुरुवात उच्चभ्रू शब्दांनी तर शेवट अगदी सहज , कला आहे लिहिण्याची आणि ती लोकांपर्यंत पोहचवण्याची.
    विषय मार्मिक आहेच आणि काळाला धरून. विषयाला प्रत्येकाच्या नजरेतून पाहणं आणि त्याच शब्दात वर्णन करणं याची मजा तू लुटतेयस ह्याचा मला जास्त आनंद आहे आणि तू इतरांसाठी सुद्धा तुझ्या लिखाणातून आनंद निर्माण करतेयस याच कौतुक.

    पुढील विषयासाच्या लिखाणासाठी खूप शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. Swapnali, खूप खूप आभारी आहे.उत्तमोत्तम लिहिण्याचा प्रयत्न राहील.

      Delete
  4. प्रिय अनु,
    .......लिहीत रहा,
    भरपूर प्रवास (आपल्या भारतात केलास तर मस्तच) कर,
    माणसं वाच, माणसं बोलरी कर, माणसं लिही, या बरोबर जर सुंदर विविधांगी फोटोग्राफी केलीस तर सोन्याहून पिवळं
    ,
    Keep it up dear

    ReplyDelete
    Replies
    1. काका, प्रयत्न असाच राहील.

      Delete
  5. लेखणी खुप सुंदर आहे

    ReplyDelete
  6. Hi nice to read it. You really throw your heart in it. It’s like every ones story I am in for your act let’s do it. I am that at your age your are so sensitive and well read keep it up. All the best. Waiting for your next blog earnestly

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks alot maamm..There would be sincere effort from my side always for sure.

      Delete
  7. Khup chhan. I m proud of u dear.

    ReplyDelete
  8. Khup chan .Shubhecha

    ReplyDelete
  9. खुप छान अनघा... 😘

    ReplyDelete
  10. अप्रतिम,सुंदर दर्जेदार लिखाण... असंच छान छान लिहीत रहा... 😊

    ReplyDelete
  11. अप्रतिम
    Sharing आणि Caring दोन्ही खूप महत्त्वाचं आहे

    ReplyDelete
  12. मनात असा एक कोपरा नकीच असतो असा!! छान!!

    ReplyDelete