यमुनातीरावर ते दोघं बसले होते.कृष्ण कृष्ण आणि राधा ही कृष्ण. कृष्ण त्याचा अत्यंत लाडका पावा वाजवत होता आणि सोबत त्याची अतिप्रिय राधा. तो क्षण इतका दैवी वाटावा की एखाद्या लोभस चित्रात बंद करून ठेवावा की काय असा मोह व्हावा .
कृष्ण पावा वाजवत असतानाची त्याची मुद्रा राधा नेहमीच डोळ्यांत साठवून ठेवत असे. कृष्ण तिच्या भाबडीच्या वाट्याला यायचाच केवढासा म्हणा. म्हणूनच की काय, ही तसबीर ती डोळयातून घटाघटा साठवत तिच्या आठवणीसाठीची शिदोरी जपून ठेवत असे. पण हे काय, आज राधेच्या डोळ्यांत आलेले अश्रू आनंदाचे का बरं वाटत नाहीत?
मोठ्या मुश्किलीने राधेने घशातून ओठांवर येऊ घातलेला हुंदका गच्च मिटला. तिच्या कोणत्याच वागण्याने तिला तिच्या कृष्णाला दुखवायचं नव्हतंच. पण राधा गहिवरली आहे आणि कृष्ण अनभिज्ञ राहील असं होईल का? पावा थांबला. कृष्णाने अलगद डोळे उघडले आणि राधेच्या चेहऱ्यावरील सारे भाव चटकन त्याचा डोळ्यांतून तरळले. तरीही त्याला तिच्या तोंडून ऐकायची होती तिची शंका जिने राधेच्या मनाच्या तीरावर आज लाटा उसळल्या होत्या. कृष्णाने विचारलं “ राधे, काही चुकलं का ग माझं? आज तुझा चेहरा असा दुःखी का? “ राधेने उसनं हसू आणत कृष्णाचा प्रश्न टाळू पाहिला पण कृष्णाच्या हट्टापुढे राधेचा कितीसा निभाव लागणार होता.
अखेर, राधेने कृष्णाला म्हटलं, “तू साऱ्या जगाचा असतानाही मला कसलीच चिंता नसते कारण साऱ्यात असूनही तू फक्त माझा असतोस. पण....”
कृष्ण: पण काय राधे?
राधा: तुला तुझा पावा प्रिय की मी रे?
कृष्णाने राधेला दिलेलं उत्तर असं होतं “ मला पावा याचसाठी आवडतो, कारण तू सोबत असतानाचा प्रत्येक क्षण मी माझ्या बोटांनी या रंध्रात साठवून तुझ्या मुर्तीला आणि या क्षणाला माझ्या गळ्यात अमर करु शकतो”
राधेला कृष्णाच्या नजरेत एक वेगळीच राधा सापडली....

👌
ReplyDeleteमाझ्या गळ्यात अमर करू शकतो❤️��������������������������
ReplyDelete🌹🤝👌👌👌👌👌👌
ReplyDeleteछान
ReplyDelete